Popup Image

Share this powerful gallery of art and climate.

These paintings speak of survival, resistance, and care. Share this page with those who value community, creativity, and climate justice.

Back

Commons

State Climate Action

Maharashtra

जेव्हा विहिरी कोरड्या पडतात : कळमना गावातील महिलांनी पाण्याचा प्रश्न कसा सोडवला

Mythreyee Ramesh

10 April 2026

नागपूर जिल्ह्यातील कळमना गावात वारंवार पडणाऱ्या दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना बसत होता. दूरवरून पाणी
आणण्यासाठी रोजचे कित्येक तास खर्ची पडत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र सुरू होत असे.

यावर कोणताही उपाय सापडत नव्हता. हा सगळा अनुभव २०२४च्या ‘क्लायमेट गाव संवाद’मध्ये महिलांनी मोकळेपणाने
मांडला. या गावपातळीवर झालेल्या चर्चेमुळे लोकनियुक्त महिला प्रतिनिधी आणि गावकरी वातावरणबदलाच्या
आव्हानांवर विचार करू लागले.

Illustration by: Eisha Nair

Read this blog in English here.

या संवादांमधून आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (RSCD) यांच्या मार्गदर्शनातून हे स्पष्ट झाले की, कमकुवत आणि ढिसाळ व्यवस्थापन असलेली पाणीपुरवठा व्यवस्था हीच या समस्येची मुळं आहेत आणि गावातील पाणीपुरवठा समिती फक्त कागदावरच अस्तित्वात होती. त्यामुळे महिला नेतृत्वानं पुढाकार घेत या समितीची पुनर्रचना केली, जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आणि ग्रामपंचायतीत नियमित समन्वयाची प्रक्रिया सुरू केली.

साठवण्याच्या व्यवस्था, पाणी साठवून ठेवणं आणि शुद्धीकरण सुविधा, तसेच विद्यमान विहिरींची दुरुस्ती यांचा समावेश होता. या मागण्यांना महिला सभा आणि ग्रामसभेत मंजुरी मिळाली, आणि नियोजनप्रक्रियेदरम्यान रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (RSCD) यांचं मार्गदर्शनही मिळत होतं.

मंजुरी मिळणं हा फक्त पहिला टप्पा होता. नियमित बैठका आणि प्रतिनिधींच्या भेटींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कामांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण झाली. एकूण रु.१०.४५ लाख खर्च करून सहा महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात आली. यामध्ये पावसाचे पाणी साठवण्याच्या व्यवस्था, गावासाठी पाण्याची टाकी उभारणे, मुख्य पाणीपुरवठा विहिरीची दुरुस्ती आणि दोन सामुदायिक आरओ फिल्टर्सचा समावेश आहे. यामुळे कळमना गावात स्वच्छ पेयजलाची उपलब्धता सुनिश्चित झाली आणि पाणी आणण्यासाठी महिलांना लागणारा वेळ वाचला आणि त्यामुळे या महिलांना त्यांच्या उपजीविकेकडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला.

Receive Insights That Matter

Be the first to hear about new initiatives, community voices, and grounded climate solutions.